कु.वैष्णवी शर्माचे सी.ए.परीक्षेत सुयश

0

सातारा/अनिल वीर : कु.वैष्णवी सुभाष शर्मा हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटस तथा आय.सी.ए. आय.च्या सनदी लेखापाल परीक्षेत सुयश संपादन केले आहे.

    कु.वैष्णवी हिने इ.१० वी पर्यंतचे शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल,पाचगणी येथे घेतले होते.तद्नंतर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील एस.एन.डी.टी.मध्ये पूर्ण केले.तसेच पुणे येथीलच झावरे क्लासेसचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तिने आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे सी.ए.होवुनच खऱ्या पांग फेडले.तिच्या कठोर परिश्रमाबरोबरच तिच्या यशात आई-वडील व गुरुजनवर्ग यांचा सिंहाचा वाटा आहे. याबद्धल महाबळेश्वर नागरिक व शिक्षणप्रेमी आदींनी कु.वैष्णवीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here