सातारा : सामाजिक जाणिवेतून मानवाने कृतियुक्त काम केल्यानेच आत्मविश्वास वाढत असतो.असे प्रतिपादन जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे हिशोब तपासणीस अरुण गायकवाड यांनी केले.
विलासपूर (सातारा) येथील निवासस्थानी कालकथित (मूळचे गाव जळगाव,ता.कोरेगाव) ऍड. सुरेश कमलाकर माने यांचा पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमात अरुण गायकवाड आदरांजलीपर बोलत होते.ते पुढे म्हणाले, “शासकीय नोकरी सोडून ऍड.माने यांनी वकिलीचे काम जनताजनार्धनासाठी अविरतपणे व शेवटच्या श्वासापर्यंत केले.” यावेळी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या ३८ विचारधारेपैकी एकावर नंदकुमार काळे यांनी उत्तममबाबत भाष्य केले.अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. प्रारंभी, विश्वजीत जाधव,ऍड. वैभव माने,ऍड.अनिल माने आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ. गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस व ऍड.सुरेश माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मेणबत्तीही मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आल्या. बौद्धाचार्य चंद्रमणी बनसोडे यांनी संपूर्ण विधी पार पाडला. उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी श्री.व सौ.जाधव, रमेश इंजे,विजय गायकवाड, नंदकुमार काळे,ऍड.धावरे, ऍड. विलास वहागावकर, अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.