कृषि औजारे व बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

सातारा दि. 24 –  जिल्हा परिषद सेस अंतर्गत जिल्हयातील  शेतकऱ्यासाठी कृषि विभागामार्फत विविध कृषि औजारे व बियाणे वितरण या बाबीसाठी अर्ज मागविणेत येत आहेत. यामध्ये कॅनव्हास /एचडीपीई ताडपत्री, सायकल कोळपे, 3,5,7.5,एचपी ओपन विदयुतपंप,4,5,एचपी डिझेल इंजिन, एचडीपीई, पीव्हीसी पाईप, ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर, पलटी नांगर,पाचटकुटटी यंत्र, पेरणीयंत्र. मधमाशांचा मधपेटया,सुधारीत/संकरीत बियाणे.यांचा समावेश आहे. कृषि विभाग, पंचायत समिती येथे दि.15 ऑगस्ट 2023. पर्यत अर्ज सादर करावेत. तसेच मधमाशांच्या मधपेटया ही योजना 11 तालुक्यांसाठी राबविली जाणार आहे. मधपेटयांसाठी  100% अनुदान (जि.प.कृषि विभाग 50%+ मधसंचालनालय 50%) शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

   लाभार्थी शेतकऱ्यांची निवड लॉटरी पध्दतीने होईल. अधिक माहितीसाठी कृषि विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत,असे आवाहन  विजय माईनकर, कृषि विकास अधिकारी सातारा जिल्हा परिषद सातारा हे कळवितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here