केंद्र सरकारचा बहुजन विरोधी अर्थसंकल्प बहुजन मुक्ती पार्टीने जाळला.

0

सातारा/अनिल वीर : बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयपुढे केंद्रीय बजेट जलाओ आंदोलन करण्यात आले आहे.

      मागील वर्षी मोदी सरकारने जे बजेट सादर केले होते. त्यापेक्षाही यावर्षी कमी बजेट सादर करुन भारतीय जनतेला फसविण्याचे कार्य मोदी सरकारने केले आहे.जसे की मागील वर्षी शिक्षणावर 2.64% व या वर्षी 2.51% आरोग्यावर 2.20% या वर्षी 1.98%, शेतीवर 3.84% या वर्षी 3.20%, ग्रामीण विकास वर 5.81% या वर्षी 5.29% प्रधानमंत्री फसल बिमा योजनेवर 15,500 करोड तर या वर्षी फक्त 13,625 करोड,म.न.रे.गा. योजनेवर मागील वर्षी 73,000 करोड तर या वर्षी मात्र फक्त 60,000 करोड, प्रधानमंत्री सन्मान निधीवर मागील वर्षी 68,000 करोड तर या वर्षी फक्त 60,000 करोड, एग्रीकल्चर फर्टीलायझरवर मागील वर्षी 2,25,000 करोड़ तर या वर्षी फक्त 1,75,000 करोड, अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय मागील वर्षी 5,020 करोड तर या वर्षी 3,017 करोड घोषित केलेले आहे. अशाप्रकारे केन्द्र सरकारने मागील वर्षांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात भारतीय लोकांकरीता बजेट सादर केलेले आहे. या बजेटमध्ये एससी, एसटी व ओबीसी या प्रवर्गासाठी कोणतीही विशेष तरतुद करण्यात आलेली नाही.सर्व कष्ट करणाऱ्या शेतकरी, कामगार, युवा, बेरोजगार व महिलांना विकासाचा नावावर फसविले जात आहे व त्यांना संविधनिक हक्क अधिकारापासून वंचित केलेले आहे. म्हणून भारतीय जनतेच्या मनामध्ये या केंद्र सरकारच्या बजेट विरोधात आक्रोश निर्माण झाला आहे. तो आक्रोश बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये बजेट जलाओ आंदोलन करण्यात आले आहे.आंदोलनाचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तुषार मोतलिंग (प्रदेश सदस्य, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र) यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.यावेळी संजय जाधव (जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी-युवा आघाडी), कांचन बनसोडे (महिला आघाडी जिल्हाध्यक्षा),शालन भोसले (महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष), संजय रुद्राक्ष (कराड तालुकाध्यक्ष), विनोद कांबळे (महाबळेश्वर तालुकाध्यक्ष), अमोल कांबळे (जावळी तालुकाध्यक्),विनोद लादे,कैलास कांबळे, पोपट माने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here