केळघर घाटात पडझड सुरूच !

0

सातारा/अनिल वीर : पावसाची रिपरिप चालु आहे.तशी केळघर घाटात पडझडही ठिकठिकाणी चालु झालेल्या आहेत.

   सातारा – महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाट नागमोडीचा आहे. एका बाजुला दरडीचा भाग हा केळघर ते महाबळेश्वर असा आहे.वर्षा पर्यटनसाठी पर्यटकांची जा-ये चालूच आहे. रस्त्याचे काम रुंद आणि चांगल्या प्रतीचे झाले असल्याने पावसाच्या सुरुवातीस तरी पडझडीचा अडथळा जाणवत नाही. कोसळणाऱ्या दरडी पूर्ण रस्त्यावर पडल्या तरी अद्याप तरी वाहने जा-ये करीत आहेत. मात्र,मोठ्या प्रमाणावर दरडी पडल्या तर वाहने जैसे-थे थांबतील.तेव्हा सम्बधितांनी जेसीबी व संबंधित यंत्रणा घाटात सतर्क ठेवणे गरजेचे आहे.अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here