कोण होणार सेवागिरी चषकाचा मानकरी, क्रीडा रसिकांच्या उत्कंठा शिगेला!

0

भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा पुसेगाव 

 पुसेगाव  दि.22

परमपूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराज यांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव तालुका खटाव येथे अखिल भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा बुधवार गुरुवार दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2024 घेण्यात येणार असल्याची माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव,बाळासाहेब जाधव,संतोष वाघ, गौरव जाधव,व सचिन देशमुख यांनी दिली आहे.

   

अखिल महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री सेवागिरी यात्रेच्या निमित्ताने या पुसेगाव नगरीमध्ये घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेची उत्कंठा आता शिगेला पोहोचली असून सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक क्रीडा प्रेमी या स्पर्धेचे उत्सुकतेने वाट पाहत आहेत.या स्पर्धेसाठी देशातून अनेक आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल पटू तसेच हॉलीबॉल संघ  या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील ही हॉलीबॉल स्पर्धा नामांकित स्पर्धेमध्ये एक गणली जाते. हजारो क्रीडाप्रेमीच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा दिवस रात्र खेळवली जाते. यावर्षी कोण होणार सेवागिरी चषकाचा मानकरी याकडे क्रीडा रसिकांचे लक्ष लागले आहे.

 

श्री सेवागिरी चषक 2024 अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धा या शूटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया व ॲम्युचर शूटिंग बॉल स्पोर्ट्स असो. महाराष्ट्र असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार व नियमाप्रमाणे होतील या स्पर्धा दिवस-रात्र साखळी पद्धतीने खेळवल्या जातील.या स्पर्धेसाठी येथील हनुमानगिरी विद्यालयाच्या मैदानावर खेळवल्या जाणार असून मैदानाची तयारी पूर्णत्वास आली आहे. या स्पर्धेचा आनंद व लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 91 42 26 0 3 47, 90 49 95 61 58, व 94 21 11 52 72 या नंबर वरती संपर्क साधावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here