कोयनाकाठच्या रासाठी, आंबेघरमध्ये व्यसनमुक्तीचा घूमतोय नारा…

0

गेल्या 30 वर्षांपासून लाखो व्यसनी व्यक्तींना विनामूल्य व्यसनमुक्त करण्याचा श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्त केंद्राचा अनुभव 

सातारा /प्रतिनिधी*(शंकर कदम)

   पाटण तालुक्यात कोयना काठावर रासाठी -आंबेघर या गावात श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा केंद्राच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून विनामूल्य तत्त्वावर व्यसनमुक्तीचा अनोखा मूलमंत्र जपला जात असून या केंद्राचे संस्थापक नाना महाराज फुके, यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरातून आलेल्या लाखो व्यक्ती व्यसनमुक्त झाले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कोयनानगर परिसरात  रासाठी- आंबेघर (ता. पाटण) येथे 1994 पासून श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा केंद्र सुरू आहे. दर गुरुवारी या ठिकाणी व्यसनमुक्ती बाबत व्यसनी व्यक्तींना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे दर गुरुवारी हजार ते बाराशे व्यक्तींना घेऊन त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी नाव नोंदणी विनामूल्य करण्यात येत असून प्रवचन, प्रबोधन आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून अनेक अट्टल व्यसनी व्यक्तींच्या व्यसनाच्या सवयी मोडून टाकण्यात येथे यश आले आहे. मौखिक मार्गदर्शनाबरोबरच व्यसनी व्यक्तीस तीर्थ आणि जपमाळ दिली जाते. साधारण सलग पाच गुरुवार संबंधित व्यक्तीने या केंद्रात भेट दिल्यानंतर मानसिक परिवर्तन आणि प्रबोधनाद्वारे संबंधित व्यक्ती पूर्णपणे व्यसनमुक्त होते, असा लाखो व्यक्तींचा अनुभव आहे. लांब अंतरावरून बुधवारी मुक्कामासाठी येणाऱ्या व्यक्तींना महाप्रसादाची सुविधा येथील सेवा केंद्रातर्फे करण्यात येते. याशिवाय दत्त जयंती, गणेश जयंती, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि दर पौर्णिमेला येथे अन्नदान करण्यात येते. याशिवाय ट्रस्ट तर्फे वेळोवेळी रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक मदत करून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाते. आपल्या कुटुंबातील किंवा परिचित्यांपैकी कोणी व्यसनांच्या आहारी गेले असल्यास त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा केंद्र हा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. या केंद्रामुळे अनेकांना व्यसनमुक्त होण्यासाठी मदत मिळाल्याची प्रतिक्रिया व्यसनी व्यक्तींच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.     

*व्यसनमुक्ती केंद्र मार्फत सामाजिक बांधिलकी*.    

व्यसनामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळतात तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मुली यांची अक्षरशः फरफट होते या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून नाना महाराज फुके  यांच्या पुढाकारातून सुरू असलेला हा व्यसनमुक्तीचा यज्ञ समाजास प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here