पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. नवजा परिसरात दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा ६५.४३ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
गेल्या २४ तासांत जलाशयात तीन टीएमसी पाणीसाठा वाढला असून, कोयनानगर येथे १३६ मिलिमीटर, नवजाला २०२ मिलिमीटर व महाबळेश्वरला १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस गेली पाच दिवस कोसळत आहे.काल दिवसभर अखंडित पावसाच्या सरी कोसळत होत्या. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून सध्या एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, काल रात्री साडेआठ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
Home महाराष्ट्र कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; महाबळेश्वरला 158 मिलिमीटर...