सातारा : क्रांतीसुर्य म .ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन आहे. या दिवशी ज्योत मालवली असली तरीसुद्धा त्यांनी हजारो वर्षाच्या अंधकारतून बहुजन समाजाला बाहेर काढून गुलामगिरीतून मुक्त केले आहे.शैक्षणिक क्रांती करून ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश दिला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेली प्रकाशज्योत कधीही मालवणार नाही.तेव्हा सर्व बहुजनांनी त्यांच्या विचारानुसार मार्गक्रमण केले पाहिजे.असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ.वैशाली वीर यांनी केले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वेण्णानगर शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौ.वीर अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
प्रथमतः म.फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी अध्ययनार्थीसह मान्यवर,शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.सौ. रुपाली वाघ यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास पालक,अध्ययनार्थी व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.