क्रांती दलातर्फे क्रांतिकारक यांना अभिवादन

0

सातारा/अनिल वीर : गोपूज, ता.खटाव येथे क्रांतिज्योतीचे स्वागत करून क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जनता क्रांती दल, महाराष्ट्र यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ऍड. संतोष क्रमाने व कार्यकर्ते उपस्थीत होते.

              ब्रिटिशांच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असतानाच त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून सशस्त्र क्रांतीचा लढा उभारणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक होते.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची प्रेरणा राजे उमाजी नाईकांना मिळाली. यातूनच वयाच्या १८ व्या वर्षी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उठाव करण्याचे धाडस त्यांनी दाखवले व परकीय सत्ता झुगारून ‘स्वराज्य’ उभारण्याचा प्रयत्न केला. राजे उमाजी नाईकांनी स्वतःची फौज उभी केली. राज्यात स्वतःचा ध्वज निर्माण केला. राजे उमाजी नाईकांनी पेठवलेली ही क्रांतीची ज्योत पुढे अनेक क्रांतीकारकांना प्रेरणादायी ठरली.क्रांतीगुरु लहुजीवस्ताद साळवे व राजे उमाजी नाईक यांचे गुरुशिष्याचे नाते होते.सर्व समाजबांधवांना एकत्र घेऊन ब्रिटिश राजवटीच्या विरोधात सर्वप्रथम एल्गार पुकारणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here