सातारा : मानवाजवळ मैत्री, करुणा,प्रेम, बंधुभाव,सहिष्णुता असली पाहिजे.क्रोद्धाची हत्या केलीच पाहिजे.क्रोद्धावर मात केली तरच खऱ्या अर्थाने जीवन सुखकर होईल.असे प्रतिपादन भंते दिंपकर (थेरो) यांनी केले. मानेवाडी (अंबावडे खु।।), ता.सातारा येथील ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते वसंत गंगावणे यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा भन्ते यांनी धम्मदेसना दिली.
ऍड.हौसेराव धुमाळ म्हणाले, “समाजात वावरत असताना सहनशक्ती असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा असता कामा नये.” बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी वाचन करून वर्षावासचे महत्व विशद केले.त्यावर सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे बी.एल.माने यांनी सविस्तर सार कथन केला.शिवाय,माने यांनी प्रास्ताविकपर माहिती कथन केली.
माजी प्राचार्य रमेश जाधव यांनी, “बौध्द असण्याचे फायदे” या लेखाचे वाचन केले.ते पुढीलप्रमाणे आहे.
भुतांची अजिबात भीती नाही. संकटसमयी कुणाचा धावा करण्याची गरज नाही. कारण, स्वतः हात-पाय हलवायची सवय लागते.केस कापताना “आज कुठला वार आहे?” ही मूर्ख चौकशी करावी लागत नाही. घरात मूर्त्या गोळा करून त्यांना रोज आंघोळ, पूजा असले प्रकार करावे लागत नाहीत. कुठल्याही दिवशी, कधीही, काहीही खाता-पिता येते.लग्न बिनाहुंडा, स्वस्तात मस्त करून उरलेले पैसे इतर कामांसाठी वापरता येतात. बारसे,मौंज,सुंता,बाप्तिस्मा इ. बालपणीच्या कटकटी बिलकुल नाहीत.पुजारी,पाद्री,इमाम इ.लोकांशी भांडण्याची गरजच काय नाही. उपास-तापास, रोजे,करवा-चौथ, चातुर्मास यापासून पूर्ण मुक्ती. बाळाचे नाव ठेवताना जगातले सगळे पर्याय उपलब्ध असतात. सगळ्या धर्माच्या, सगळ्या सणांची सारी पक्वान्ने आनंदाने चाखता येतात.कुठल्याही दिशेला डोके किंवा पाय ठेऊन झोपता येते. स्वर्ग-नरक, कयामत, पुनर्जन्म असल्या भंपक कल्पनांचा त्रास व भीती नाही. सक्तीची दक्षिणा, जकात नाही. थोडक्यात, खिशाला चाट नाही. कुणालाही भाडेकरू म्हणून ठेवता येते.भाड्याने घर पण सहज मिळते.धार्मिक मुद्यांवरच्या TV वरच्या चर्चा पाहून panel वरच्या लोकांची कीव करता येते. प्रार्थना,स्तोत्रे, आयाती इत्यादी बिनकामाचे पाठांतर नाही. “मुलांना काही धार्मिक शिकवत नाही का?” या प्रश्नाला छानपैकी हसून निकाली काढता येते.दंगली, धर्मयुद्ध, जिहाद आदी मूर्खपणाला कवटाळण्याची गरजच नसते तर सुखाने जगता येते. घरात आपले आई-बाबा असतानादेखील उगीच दुसर्या कुणाला स्वयंघोषित ‘माझी आई – माझा बाप’ बोलून खोटा ढोंगीपणा करण्याची गरज भासत नाही.
चांगलं शिक्षण प्राप्त करून प्रबोधन करता येते.डोकं गहाण ठेवून कुण्या बुवाबाबांच्या नादाला लागण्याची आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालून आपल्या मूर्खपणाची खात्री पटवून देण्याची गरज नसते. पैशाचा सदुपयोग करून आपला सर्वांगीण विकास करता येतो आणि घरी सुबत्ता आणता येते.थोडक्यात, या सगळ्यांना फाटा देऊन आपले आयुष्य स्वत:च्या सोयीने-इच्छेने, विवेकाने, आनंदात, शांततेत आणि कुठल्याही आडकाठीशिवाय मस्तपैकी जगता येते.म्हणुनच बाबासाहेबांनी आम्हाला पाखंड व अंधश्रध्दा यांना मागे सोडणारा बुद्ध धम्म दिला आहे.” वसंत गंगावणे यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे, सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे, माणिक आढाव,प्रशांत झालटे, अशोक भोसले,सुखदेव घोडके, माजी शिक्षणाधिकारी डी.एस. भोसले,अनिल वीर,अंकुश धाइंजे,शोभा भंडारे, विश्वास सावंत,दादासाहेब केंगार आदी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते,गंगावणे सर्व कुटुंबीय,उपासक व उपासिका उपस्थित होत्या.