सातारा/अनिल वीर: येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय आणि प्रणीत प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धहस्त लेखक, कवी आनंदा शंकर ननावरे यांच्या चौथ्या पुस्तकाच्या “क्षण आनंदाचे” या कथासंग्रहाचे प्रकाशन येथील पाठक हॉल श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रा.श्रीधर साळुंखे (जेष्ठ विचारवंत, वक्ते, लेखक) होते.प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द कादंबरीकार, लेखक, कवी डॉ. राजेंद्र माने, प्रकाशक, लेखक, कवी. प्रणीत प्रकाशन-प्रदीप कांबळे, अश्वमेध ग्रंथालय संस्थापक अध्यक्ष रविंद्र भारती झुटींग,आरोग्य सभापती. न.पा. सातारा. सुप्रसिद्ध निरुपणकार व विचारवंत-एन. जी. देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जयमाला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर, लेखक-आनंदा शंकर ननावरे, प्रा. दिपक आनंदा ननावरे,एन.जी.देशपांडे, कुमारी समृध्दी दिपक ननावरे,प्रकाशिका सौ. सुनिता प्रदीप कांबळे, सौ. शुभांगी दिपक ननावरे, कु. सिध्देश दिपक ननावरे,हरिदास जाधव,पत्रकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.