खटाव तालुक्यात आजपासून शासन आपल्या दारी

0

वडूज : खटाव तालुक्यात प्रत्येक मंडलाधिकारी स्तरावर शासनाद्वारे शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार यामध्ये नागरिकांना विविध सेवा जागीच देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने हस्तलिखित सातबाराप्रमाणे चालू संगणकीकृत सातबारा दुरुस्ती करणे, वारस नोंद करणे, अ. पा. क शेरा कमी करणे, राजपत्रांने नावात बदल करणे, ए. कु. मॅ. शेरा कमी करणे इत्यादी कामे करून दिली जाणार असून या सर्व कॅम्पचे आयोजन प्रत्येक मंडल निहाय वेगवेगळ्या दिवशी करण्यात आले आहे .

यामध्ये पुसेगाव सोमवार, दि. ९, कलेढोण मंगळवार, दि. १०, बुध बुधवार, दि. ११, खटाव गुरुवार, दि. १२, वडूज शुक्रवार, दि. १३, मायणी सोमवार, दि. १६ पुसेसावळी बुधवार, दि. १८, भोसरे गुरुवार, दि. १९ औंध शुक्रवार, दि. २०, निमसोड सोमवार, दि. २३, कातरखटाव मंगळवार, दि. २४ असा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सर्व कॅम्प प्रत्येक मंडल अधिकारी कार्यालयामध्ये होणार आहेत. संबंधित कागदपत्रे सादर करून शासन आपल्या दारी या उपक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महसूल विभागाकडून तहसीलदार बाईमाने यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here