गोंदवले – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अनेक गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात.त्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणी येतात. याची जाणीव ठेवणारे मूळचे लोधवडे ता माण जि.सातारा या गावचे रहिवाशी असणारे व पूर्वी आपल्या गावच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आणि सध्या गडचिरोली या ठिकाणी डी वाय एस पी या पदावर प्रामाणिकपणे सेवा बजाविणारे मा.चैतन्य वसंतराव कदम तसेच ठाणे पोलीस स्टेशनमध्ये सेवा करणारे पट्टीचे कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू तात्यासो माने.यांना गरीब परिस्थितीने शालेय जीवनात शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.याची जाणीव ठेवून सेवाव्रत जपणाऱ्या या पोलीस दलातील सेवकांना गावच्या शाळेबद्दल नेहमीच जिव्हाळा वाटतो.
लोधवडे शाळेतील कार्यरत प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे व दिपक जगन्नाथ कदम यांच्या मागणी आणि प्रयत्नातून चैतन्य कदम यांनी लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांची स्कूल बॅगची अडचण ओळखून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनासाठी त्यांनी उत्तम प्रतीच्या एकशे पन्नास स्कूल बॅगा एका कंपनीकडून घेऊन पाठवून दिल्या व त्या बॅगा लोधवडे गावच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे कोकण विभागाचे माजी आयुक्त मा.प्रभाकर देशमुख साहेब, कस्टम ऑफिसर मा.अमोल जाधव साहेब,खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबुराव काटकर,सोसायटीचे माजी चेअरमन वसंतराव कदम, उपसरपंच वैशाली देशमुख,माजी सरपंच शामराव पवार, माजी उपसरपंच मंदाकिनी कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक चोपडे,उमेश जाधव सर व इतर मान्यवर सदस्यांच्या शुभ हस्ते या बॅगांचे नुकतेच शाळेत वितरण करण्यात आले.
तसेच या आधी नुकत्याच पार पडलेल्या लोधवडे गावच्या खास यात्रेनिमित तात्यासो माने या पोलीस दलातील सेवकांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत एकशे पन्नास कॅपचे वाटप केले आहे. या अगोदरही त्यांनी दोन वर्षापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगा दिल्या होत्या.याशिवाय त्यांनी याही वर्षी शाळेच्या विकासासाठी देणगी स्वरूपात अकरा हजार एकशे एक रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या पोलीस दलातील देश सेवकांनी मागे वळून पाहत आपली माती,माणस आणि शाळेशी अतूट ऋणानुबंधाचे अतूट नाते ठेवून मदतीचा ओघ झऱ्यासारखा चालूच ठेवला आहे.त्यांनी गोरगरीबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आहे. विद्यार्थ्यांनाच्या जीवनात एक प्रकारचा आनंद निर्माण केला आहे. अशा ह्या खाकी वर्दीतल्या देश सेवकांनी खरोखरीच माणुसकीचे नाते जपले आहे.पोलीस दलातील या दात्यांना सरपंच निवास काटकर, उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे,माजी उप सरपंच दिलीप चव्हाण,वैभव मोरे, पोलीस पाटील अनिल लोखंडे, राजकुमार माने, दादासो चोपडे,शिवाजी मोरे व लक्ष्मण पवार या शिक्षणप्रेमी व्यक्तींनी व पालकांनी मनापासून खूप खूप धन्यवाद दिले आहेत.
अशा या बॅग वितरण सोहळ्यासाठी शशिकांत देशमुख,माने महाराज, जालिंदर काळोखे,रेश्मा शिलवंत, तनुजा जगताप,श्रीकांत काळोखे, विजय अवघडे, शिक्षक दिपक कदम, संतराम पवार,सतेशकुमार माळवे, सुचिता माळवे, दिपाली फरांदे व अश्विनी मगर आदींचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन शिक्षक सतेशकुमार माळवे यांनी केले तर प्रभारी मुख्याध्यापक दिपक कदम यांनी आभार मानले.