सातारा/अनिल वीर : गाळा मालकाचे नाव खाडे असून दुसराच त्याचा वापर सुनील पोरे हे ओबीसी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य भाजपसाठी करीत आहेत.
सदरचा गाळा भाजप कार्यालयासाठी वापरला जातो. नगरपालिकेचे गाळे पोट भाडेकरू तसेच कुठल्याही राजकीय पक्षाला वापरता येत नाहीत.तेव्हा योग्य ती कार्यवाही करून न्याय मिळावा.अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष आजिनाथ केवटे यांनी म्हसवड पालिकेचे मुख्याध्याकारी सचिन माने यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.