खा.श्रीनिवास पाटील यांची महाबळेश्वर येथे होणाऱ्या दुसऱ्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड

0

सातारा/अनिल वीर :  मुक्त सृजन साहित्य पत्रिका छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)व गिरीस्थान महाविद्यालय, महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वर येथे होणाऱ्या दुसऱ्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे.  

   श्रीनिवास पाटील यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत 1965 साली उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यानंतर प्रांताधिकारी, कार्यकारी संचालक ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,साखर संचालक, जिल्हाधिकारी आयुक्त , संसदीय सल्लागार समितीचे सदस्य, नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष,अध्यक्ष अशा विविध पदावर व समित्यावर त्यांनी कार्य केले आहे.भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे ते क्रियाशील सदस्य होते. 1999 साली कराड मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले नंतर दुसऱ्यांदा तेथूनच ते निवडून आले. 2013 ते 2018 या काळात ते सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. कराड येथे भरलेल्या 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. कराड येथेच भरलेल्या 84 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते सदस्य होते. त्यांनी लोककला ,कबड्डी ,खो-खो व कुस्ती या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. आता सातारा लोकसभा मतदारसंघाचे ते विद्यमान खासदार आहेत.खासदार श्रीनिवास पाटील यांची महाबळेश्वर येथे दिनांक 21 व 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या दुसऱ्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.महेश खरात यांनी जाहीर केले. सदर बैठकीला प्राचार्य डॉ. चंद्रकांत कदम, प्राचार्य डॉ. रामकिशन दहिफळे, डॉ. संतोष देशमुख, प्रिया धारूरकर,डॉ. निलेश देगावकर,डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ, दीपक बावळेकर,डॉ. बाजीराव शेलार, डॉ. शरद गोळे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here