गोदवले:-गेल्या तीन वर्षांपासून मार्डी मार्गे खुंटबाव येथे जाणारी एस टी बस बंद असलेने लोकांची गैरसोय होत आहे त्यासाठी एस टी बस पूर्ववत सुरू करावी अशी मागणी महिला अधिकार परिषदेच्या वतीने मा.तहसीलदार व आगरप्रमुख याना निवेदनाद्वारे करणेत आली.
निवेदनात म्हटले आहे की मार्डी ही मुख्य बाजारपेठ असून शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र,बँका असून आठवडा बाजार भरतो.गेल्या तीन वर्षांपासून एस टी बंद आहे त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध लोक,गरीब एकल निराधार महिला तसेच बचत गटातील महिला यांना पायी चालत जावे लागत आहे लोकांचे खूप हाल होत आहेत यासाठी मार्डी मार्गे दिवसातून किमान दोन वेळा एस टी खुंटबाव येथे सुरू करावी अशी मागणी खुंटबाव येथील महिलांनी महिला अधिकार परिषदेच्या मार्फत केली असून एस टी सुरू न झालेस आंदोलनाचा इशारा दिलेला आहे
निवेदनावर अध्यक्ष भारती पवार,रेश्मा शिलवंत,अस्मिता तुपे,वंदना कुंभार,तौसिफ मुलाणी,रेश्मा साळुंखे,मालन चोपडे, सारिका जाधव,अलका ननावरे,सारिका गायकवाड,वैशाली चव्हाण भामाबाई ननावरे,राणी अहिवळे, योगिता पाटोळे,केसर द्वारकांडे,विद्या शिरतोडे,बाळूताई शिंदे प्रियांका जाधव ,हाफिजा मुलाणी रुक्मिणी शिरतोडे आदि महिला उपस्थित होत्या.
छाया – तहसिलदार यांना निवेदन देताना महिला परिषदेच्या सदस्या.