सातारा : भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत.तेव्हा संविधान लोकजागर परिषद व सविधानप्रेमी समूहाकडून व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.खेड व अंबवडे सं.येथे शाहिर भानुदास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधींनी भेट देऊन सम्बधितांना माहिती दिली.
याबाबत येथील मुख्यालयाच्या निवासस्थानी अध्यक्ष भगवान अवघडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण सभेत वरील निर्णय घेण्यात आला होता.यावेळी संघटक अनिल वीर,साहित्यिक सुरेश (आबा) मुळीक,अंनिसचे प्रकाश खटावकर आदी मान्यवर-कार्यकर्ते उपस्थीत होते.
पालवे (कोकण) व मुंबईत ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षणार्थीकरवी संविधान प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे.सखोल असा अभ्यास संविधानाचा असणे गरजेचा आहे.भारतीय राज्यघटना निर्मिती मागची भूमिका आपल्या देशात समता, बंधुता, एकता, एकात्मता, नांदावी व ती लोकांमध्ये रुजावी.तसेच सर्वांनी आनंदाने सुखाने रहावे.पण, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. तर देशातील समाजिक विषमता वाढताना व माणसा-माणसांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष पसरताना दिसत आहे. ही विषमता दूर करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे.