कडेगाव : कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशी झाली भाजपा विरुद्ध कॉग्रेस याच्या पारंपरिक लढतीत कॉग्रेसने जोर्तिलिंग पॅनेल चे ११पैकी नऊ उमेदवार विजयी तर भाजपाला दोन जागावर समाधान मानावे लागले आहे . काँग्रेसच्या जोर्तिलिंग पँनेलचे सर्वोसर्वा असणारे दशरथ (बापू) सूर्यवंशी यांनी सर्व धुरा सांभाळत भूमिका महत्वाची बजावली आहे. राजा दशरथाने राणी कैकयीच्या हट्टसाठी प्रभू रामचंद्रांना राजगादी पासून दूर करत १४ वर्षे वनवासात पाठवले होते. मात्र या कलियुगातील आधुनिक दशरथाने आपला मुलगा लक्ष्मण याला लोकनियुक्त सरपंचपदाच्या गादी पासून दूर ठेवत अन् जि .प निवडणूकीत आमदार मोहनराव कदम याचा पराभव करणारे माजी जि प उपाध्यक्ष दत्तूशेठ सूर्यवंशी याच्या पुतण्याला निवडणूकी आधी काँग्रेस पक्षात आणले. याच अनिल सुर्यवंशीलाच लोकनियुक्त सरपंच करणार ही वचनपुर्ती घेतच कामाला सुरवात केली. आपल्या मुलाला लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवारी पासून दूर ठेवले. आपल्या इच्छा शक्तीला तिलांजली देत मुलाला बाजूला केले. अन विरोधक दतूशेठ सुर्यवंशी यांच्या पुतण्या अनिल सुर्यवंशी यास उमेदवारी देवून निवडून आणण्याचे शिवधनुष्य दशरथ सुर्यवंशी(बापू) वचनपुर्ती प्रमाणे उचलले होते. तर प्रबळ विरोधकाला समोरे जात असताना कॉग्रेसच्या वतीने हा अत्यंत कसोटीचा काळ होता. स्वर्गीय पतंगराव कदम , मोहनराव कदम, डॉ विश्वजीत कदम यांना मानण्याऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्याची मोळी बांधून मतदारांना विश्वास देत ही निवडणूक जिंकण्याचा विडा त्यांनी उचलला होता. मतदारांनी सुध्दा त्याच्यावरती विश्वास टाकला हा विश्वास मतदारानी सार्थ करतच जोर्तिलिंग पॅनेलला विजयी केले. दशरथ बापू सूर्यवंशी म्हणाले की हा विजय कदम घराण्याचा विचारांचा आहे. डॉ पतंगराव कदमच्या नंतर आमचा धीर खचू न देता मोहनराव कदम, डॉ विश्वजीत कदम यांनी आम्हाला बल देत प्रेरणाही दिली आहे. डाँँ पतंगराव कदम यांच्या निधनानंतर ही आमची पहिलीच निवडणूक होती. ती आम्ही जिंकून डॉ पतंगराव कदम यांना श्रद्वाजंली अर्पण केली. प्रबळ विरोधकासोबत कोणीही ठक्कर देण्यास तयार नसताना हा विजय दशरथ( बापू) सूर्यवंशी व जोर्तिलिंग पॅनेलचे सर्व उमेदवार कदम घराण्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांनी अक्षरशः खेचून आणला. भाजपच्या सत्तेला धोबीपछाड करत पुन्हा काँग्रेसने खेराडे वांगीत सत्ता काबीज केली. या वादळ्यात दिवा लावण्याचे काम दशरथ बापूनी इमान इतबारे करुन यशस्वी करून दाखवले मग चर्चा तर होणारच ना ! दशरथ बापू सूर्यवंशी याच्या नावाची एवढे करून सुध्दा शांत पणे आजही ते आपल्या गावच्या विकासा साठी भविष्यातील योजना आखण्यात सद्या दंग आहेत. म्हणतात ना गुलाल अंगावरती कुणाच्या गुलाल पडतो तर कुणाच्या अंगावर गुलाल पडत नाही. या विजयी गुलालाच्या उधळणीत सर्वांच्या नजरा एकाला शोधत असून चर्चा तर बापूची होत असते. आपल्या मुलाला लोकनियुक्त सरपंच पदाच्या उमेदवारी पासून बाजूला ठेवत विरोधकाच्या पुतण्याला लोकनियुक्त सरपंच निवडून आणण्याचे धाडस करणारा आधुनिक दशरथ (बापू) सारखे राजकारणी आज राजकारणात दुर्मिळ आहेत त्यामुळे खेराडे वांगीसह परिसरात अजूनही निकालानंतरही हे कसे शक्य झाले याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे ही किमया फक्त एकच व्यक्ती करु शकते ती म्हणजे राजकारणातील धुरधंर किंग मेकर म्हणजेच आधुनिक दशरथ (बापू) सूर्यवंशीच…..
चौकट
सरपंचपदासाठी दोन सख्ये चुलतभाऊ एकमेकांच्या विरोधात खेराडेवांगी उभे राहिले होते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व भाजपचे कट्टर कार्यकर्ते दत्तूशेठ सुंर्यवशी यांनी आपल्या मुलगा विकासला लोकनियुक्त सरपंच पदासाठी भाजपतर्फे उभा केले होते तर काँग्रेसकडून त्याच्याच पुतण्या अनिल यास दशरथ सुर्यवंशी यांनी लोकनियुक्त सरपंच पदी उमेदवारी दिली होती अखेर अनिल सुर्यवंशी हे काँग्रेसचे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहेत