खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी : सुरेंद्र गुदगे

0

मायणी कला व वाणिज्य महाविद्यालयात सातारा विभागीय नेटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

मायणी (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व मायणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने सातारा विभागीय नेटबॉल (पुरुष व महिला) स्पर्धा शुक्रवार (दि. २० डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते झाले. खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी उपस्थितांचे स्वागत प्रा.शिवशंकर माळी यांनी केले. प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे यांनी स्पर्धा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

पंच मृगेंद्र शिंदे यांनी स्पर्धेचे नियम सांगितले. आभार प्रदर्शन क्रीडा संचालक प्रा. सम्राट अशोक शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. यावेळी सातारा क्रीडा परिषदेचे सचिव प्रा. माणिक गोरवे व खजिनदार प्रा. हृषीकेश इनामदार, मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दिगंबर पिटके, प्रशांत सणगर, प्रा. गुणकी, प्रा. विद्या पाटील, प्रा. स्मिता जगताप, प्रा. देवदत्त महात्मे, प्रा. विक्रम लांडगे, खटाव बाजार समितीचे सदस्य स्वप्नील घाडगे, ग्राम पंचायत सदस्य ऋत्विक गुदगे, प्रा. आदी मान्यवर उपस्थित होते. 

     

या नेटबॉल स्पर्धेत ९ संघांनी सहभाग नोंदविला. पुरुष गटात येथील कला व वाणिज्य महाविद्यालय या यजमान महाविद्यालयाने, तर महिला गटात कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने अजिंक्यपद मिळवले. पुरुष गटात शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड यांनी द्वितीय, तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर महिला गटात सद्गुरु गाडगेबाबा महाराज महाविद्यालय, कराड यांनी द्वितीय, तर महिला महाविद्यालय, कराड यांनी तृतीय क्रमांक मिळवला.  या स्पर्धेसाठी श्रीमंत कोकरे, प्रशांत सुतार, गणेश चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा सिद्धेश्वर सपकाळ, प्रा सूरज पडळकर, प्रा. दीपक काशीद आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here