गणेशोउत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्ताने पुसेगाव पोलीस स्टेशनची 109 गुन्हेगारांवर कारवाई : API आशिष कांबळे

0

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम :

पुसेगाव ता.खटाव येथील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत येणारे गणेशोत्सव व ईद ए मीलाद अनुशंगाने हद्दीतून 20 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे, व दाखल गुन्ह्यातील 32 इसमांचे चांगल्या वर्तणुकीचा बाँड घेण्यात आला आहे, 

गणेशोत्सवात हुल्लडबाजी करणारे 57 युवकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये केसेस करून चांगल्या वर्तणुकीसाठी सक्त ताकीद देण्यात आली असून  वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 101 वाहन चालकावर मोटर वाहनाच्या नियमानुसार  कारवाई करून  61700 रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे साहेब म्हणाले व 18 डॉल्बी धारकांना फौजदारी संहिता कलमानुसर 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर एक गाव एक गणपती योजनेनुसार 20 गावात एक गाव एक गणपती असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी 1 अधिकारी 20 पोलीस, 25 होमगार्ड दिवसरात्र सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. व एक गाव एक अंमलदार अशी सुरक्षा योजना राबवली आहे. यामध्ये 39 गावात एकूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 115 स्थापित झाली असून सर्वांना शांततेत उत्सव साजरा करणेबाबत 115 गणेश मंडळात तसेच शांतता समितीच्या 24 गावात मीटिंग घेवून शांतता अबाधित ठेवण्याच्या कडक सूचना दिल्या असल्याचे पुसेगाव पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी सातारा  प्रेस अलर्ट डिजिटल  न्यूज चैनलची बोलताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here