प्रतिनिधी. शिवाजी भोसले, फलटण : दि.२२ फलटण गिरवी येथील डायनामिक्स पेंट्स या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज दि. २२/१२/२०२२ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत ३० लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या कंपनीत कलर तयार करणार्या लाखो रुपयाच्या मशिनरी तसेच कित्येक टन कच्चा कलरचा मालही जळून खाक झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . परंतु २ ते ३ तासानंतरच्या अथक प्रयत्न नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले . या आगीमध्ये कोणतेही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. यावेळी आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना संतोष बाळासो सुस्ते व त्यांच्या पत्नी यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाही.