सातारा/अनिल वीर : शिरवली,ता.महाबळेश्वर येथील हायस्कुलमध्ये गुणवन्त अध्ययनार्थी यांचा सत्कार संस्थेने आयोजीत केला होता. एस एस सी मार्च २०२४ परीक्षेत विद्यालयाचा १०० टक्के इतका निकाल लागल्याबद्दल विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित केला होता.याही वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
प्रथम क्रमांक – कु.जाधव सानिका धोंडीराम -85.60 टक्के,द्वितीय क्रमांक – कु.शेलार अक्षदा मोहन -79.20 टक्के व तृतीय क्रमांक – कु.मालुसरे अस्मिता तानाजी – 77.80 टक्के यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि पुष्प देऊन गौरविण्यात आले. क्रयक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.कोरे (शिक्षणतज्ज्ञ व माजी रोटरी क्लब अध्यक्ष ) होते.प्रमुख पाहुणे म्हणून डी.एल.शिंदे ( प्रसिद्ध विकासक व शिक्षण तज्ज्ञ) उपस्थित होते.संस्थेचे सरचिटणीस गोविंद (काक) मोरे मनोगत व्यक्त केले तर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी प्रास्ताविक केले. शालेय सचिव शिवाजी मोरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक नितीन कासूर्डे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी बबन मालुसरे , सुनील जाधव , मारुती जाधव , विजय घाडगे आदी मान्यवर,पालक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अध्ययनार्थी उपस्थीत होते.