गुरू ग्लोबल स्कुलमध्ये कार्निव्हल २०२४ चे अयोजन

0

महाबळेश्वर प्रतिनिधी : शिक्षण कला क्रिडा अशा सर्वच क्षेत्राचा परीचय बाल वयात घडवुन आणुन गुरू ग्लोबल स्कुल विदयार्थ्याचा आत्मविश्वास वाढविण्याची उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. या कामगिरीच्या जोरावर देशाची भावी पिढी सक्षम घडेल असे प्रतिपादन प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानरंजन त्रिपाठी यांनी केले या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेश्मा बेगम उपस्थित होत्या.

महाबळेश्वर येथील मुन्वर हौसिंग सोसायटी मधील गुरू ग्लोबल स्कुलने कार्निव्हल २०२४ चे अयोजन केले होते . या कार्निव्हलचे प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे पृथ्वी आणि हवामान विज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानरंजन त्रिपाठी हे बोलत होते. या वेळी शाळेने शैक्षणिक गुणवत्ता वाढवुन अभ्यासक्रमेतर उपक्रम राबवुन विदयार्थ्यांसाठी चांगल्या वातावरणाची निर्मिती केल्या बद्दल डॉ त्रिपाठी यांनी शाळेचे विशेष कौतुक केले .

       

 मुख्याध्यापिका रेश्मा बेगम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले या मध्ये त्यांनी मागील वर्षी शाळेने केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला वर्षातुन एकदा येणार हा दिवस म्हणजे उत्सव नसुन विदयार्थ्याचे आणि शिक्षकांचे कठोर परीश्रम समर्पण व प्रतिभेचे प्रतिबिंब आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या शाळेच्या वार्षिक कामगिरीवर त्यांनी भाष्य केले

       नर्सरी ते ज्युनियर केजी या वर्गातील विदयार्थ्यानी रंगिबेरंगी नृत्य संगित नाटक अशा प्रकारच्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली या सांस्कृतिक कार्यक्रमात विदयार्थ्यांनी एकता चिकाटी व नाविन्य या सारख्या मुल्यांवर भर दिला विदयार्थ्याच्या या कलागुणांना उपस्थितांनी टाळयांच्या गजरात दाद देवुन कौतुक केले

       मागील वर्षी ज्या ज्या विदयार्थ्यांनी चांगली कामगिरी केली अशा गुणवंत विदयार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विशेष पारीतोषिक देवुन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सुश्मिता चौबे यांनी तर उपस्थितांचे आभार मिस रिफत आरीफ पटेल यांनी केले या वेळी सोसायटीचे अध्यक्ष कोंडीबा आखाडे सचिव फकीर वलगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

     शास्त्रज्ञ डॉ ज्ञानरंजन त्रिपाठी यांच्या हस्ते मागील वर्षी सर्वच पातळीवर उत्कृष्ठ कामगीरी केल्या बद्दल *अकॅडमिक अक्सलन्स* हा मनाचा पुरस्कार त्रिशा सुशिल खेडेकर व मोहमंद जेन परवेज पटेल या दोन विदयार्थ्यांना मिळाला या दोघांनाही यलो गाउन प्रमाणपत्र मिडल व स्मृतीचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले या दोघांनाही ९९. ३३ टक्के गुण मिळविले ९९ टक्के उपस्थिती लावणारी शिवन्या कदम हिला *टॉप अटेंडन्स* तर विविध क्रिडा प्रकारात उत्तम कामगिरी नोंदविणारी लुजेन पटेल हीला *स्पोर्ट क्विन* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्ञानदा इंगवले व अव्दुल हाफिज पन्हाळर या दोन विदयार्थ्याच्या पालकांचा देखिल *बेस्ट क्राफ्ट वर्क ऑफ पेरेंट* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here