सातारा : “ग्रंथमहोत्सवातील प्रमुख अतिथी म्हणुन दिलेल्या विशेष सहभागाबद्धल…. ” अशा आशयाचे प्रमाणपत्र ज्येष्ट साहित्यिक डॉ. श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते देऊन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ट पत्रकार म्हणून अनिल वीर यांचा सत्कार करण्यात आला.
सदरच्या प्रमाणपत्रावर अध्यक्ष प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे,उपाध्यक्ष वि.ना.लांडगे, कार्यवाह शिरीष चिटणीस, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे,मुख्य समन्वयक आर.पी.निकम, समन्वयक सुनीता कदम व प्रल्हाद पारटे,स्टॉल समन्वयक सुनीताराजे पवार यांच्या स्वाक्षरीसह माजी शिक्षण संचालक दिनकर पाटील,नंदा जाधव,डॉ.राजेंद्र माने,प्राचार्या प्रमोदीनी मंडपे,प्रा.साहेबराव होळ,संतोष लाड,शुभम बल्लाळ व बी.एस.इंगळे यांची नावे आहेत. याशिवाय,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर व उपशिक्षणाधिकारी तेजस गंबरे यांच्याही स्वाक्षरी आहेत.