फलटण प्रतिनिधी.
फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनतेने राष्ट्रवादी अर्थात राजे गटाला सकारात्मक कौल दिल्याने राजे गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे दिसत आहे. रविवार दि. 18 डिसेंबर रोजी मतदान झाले. मतदानापूर्वी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या.भाजपने दोन ठिकाणी विजय मिळवला. सुरवडी येथे प्रल्हादराव साळुंखे पाटील यांचा दबदबा कायम राहिल्याचे दिसत आहे. तर तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या विडणी गावाचे सरपंच मात्र भाजपला मिळाले आहे. विडणी मध्ये राजे गटाचे काँग्रेसचे 13 सदस्य व सरपंच आणि इतर तीन सदस्य निवडून आले आहेत.
सुरवडी येथे पाटील यांच्या सुनबाई सौ शरयू जितेंद्र साळुंखे या सरपंच पदासाठी निवडून आल्या आहेत. गिरवी ग्रामपंचायतीत सह्याद्री कदम गटाने विजय मिळवला आहे. भाजपने दोन ठिकाणी आणि पाटील, कदम गटाने प्रत्येकी एक ग्रामपंचायती मध्ये बहुमत मिळवले आहे.
पुढील ग्रामपंचायतीवर राजे गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. वडले संतोष दिनकर लाळगे,दुधेबावी सौ भावना माणिकराव सोनवलकर, सालपे- दादासो कोळपे, पाडेगाव-राहुल कोकरे, मठाचीवाडी- जयश्री भोसले, आदर्की बुद्रुक- गणपतराव धुमाळ, आदर्की खुर्द- नीलम निंबाळकर, बरड- प्रकाश लंगोटे, चव्हाणवाडी- चंद्रभागा गोरे, कुसुर- ज्योती नरोटे,सोमंथळी-किरण सोडमिसे, पिंपळद सौ स्वाती भगत, चौधरवाडी- तुकाराम कोकाटे, वाठार निंबाळकर सुवर्णा नाळे, ताथवडा दशरथ शिंदे, कुरवली खुर्द राहुल तोडकर,तरडफ रंजना गोडसे, विडणी-सागर अभंग, भाजप.गिरवी धनश्री कदम सह्याद्री कदम गट, सुरवडी सौ शरयू साळुंखे पाटील गट. एकंदरीत फलटण तालुक्यामध्ये मतदारांनी राजे गटाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला सकारात्मक कौल दिला आहे.