सातारा/अनिल वीर : एक कटू सत्य ठिकठिकाणी पहायला मिळाले.दै.सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन झाल्यानंतर समाज स्तुती सुमने उधळत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करायचीच असेल तर घराघरात त्यांनी निर्माण केलेला दैनिक घराघरात पोहचला पाहिजे.असे परखड मत सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,पाटण येथे सम्राटकार बबन कांबळे यांची अभिवादन सभा आयोजीत करण्यात आली होती.तेव्हा अनेकांनी आदरांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रा.रवींद्र सोनवले, बबनराव कांबळे, शंकरराव मोहितें,संजय अस्वले, शशिकांत देवकांत,शंकर भालेराव आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. सुरेश कांबळे म्हणाले, “आंबेडकर चळवळीचे जे काही कार्यकर्ते आहेत ते जिवंतपणे त्याच्यावर टीका टिपणी करण्यात धन्यता मानत होते.आता फक्त कृतीवर भर न देता बोलण्यावरच धन्यता मानत आहेत.” यावेळी अनेकांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.