अनिल वीर सातारा : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय हक्कासाठी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाबरोबरच आयुष्यभर संघर्ष केलेला होता. सर्वच समाजघटकांसाठी संविधानाच्या माध्यमातून त्यांनी न्याय दिला. देश-विदेशात त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.म्हणूनच ते भारतरत्नबरोबरच विश्वरत्न ठरले.
२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करुन हे तळे पिण्याच्या पाण्यासाठी खुले करुन दिले होते.बाबासाहेबांनी केलला हा सामाजिक समतेचा पहिला सत्याग्रह होता.त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले.मुख्य सोहळा महाड येथील चवदार तळ्यावर संपन्न झाला. तेव्हा देध-विदेशातुन भिम अनुयायिनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली होती.विविध कार्यक्रमांची रेलचेल होती.सकाळपासूनच अभिवादन सुरू असलेले रात्री उशिरापर्यंत चालु होते.