सातारा/अनिल वीर : चिखली,ता.कराड येथील प्रगतशील शेतकरी माजी सैनिक प्रकाश पाटील यांनी यावर्षी त्याच्या २३ गुंठे जमिनीत आडसाली लागणीतुन ७४ टन ऊसाचे उत्पन्न घेतले आहे.
विशेष म्हणजे सलग चौथ्या वर्षी त्यांनी सरासरी १ गुंठ्याला ३ टनापेक्षा जास्त उतारा मिळवून ऊस उत्पादनात सातत्य राखले आहे. या क्षेत्रासाठी ठिबक सिंचनाशिवाय पारंपारिक पध्दतीने पाण्याचे रासायनिक आणि जैविक खतांचा वापर करून ऊस शेतीचे नियोजन केले. यासाठी त्यांची यु. एस. के. अँग्रो सायन्सेचे कृषि अधिकारी संदिप पोवार, किसान कृषी सेवा केंद्र मसुर ता. कराड चे रफिक अत्तार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. दोन वेळा फवारणी, दोन आळवणी, बाळभरणी डोस आणि मोठी भर या पध्दतीने नियोजन केले. यु. एस. के. अॅग्रो सायन्सेसची हंस, अमिनोलाईट, रूट शाइन, एस. आर. पी.- ९ इ. उत्पादने वाढीच्या काळात वापरून ऊसाच्या उत्पादनात वाढ केली. ऊसाचे वजन वाढीसाठी एस. आर. पी. ९ चा विशेष करून वापर केला गेला. तसेच युरिया, डी.ए.पी., पोटॅश, न्युट्रीपंच या खतांचा देखील संतुलित वापर केला गेला. यासाठी प्रकाश पाटील यांना त्यांची मुले सुरज पाटील आणि आनंद पाटील यांचे सहकार्य मिळाले. ऊसाच्या विक्रमी उत्पादनाबद्दल पंचक्रोषीतील शेतकऱ्यांनी प्रकाश पाटील यांचे अभिनंदन करुन त्यांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती करुन घेतली.जिल्ह्यात शेतकऱ्यांना पाटीलकीच्या कार्यामुळे नक्कीच बळ मिळेल.