सातारा : मानव हा सर्वगुणसंपन्न नसतो.त्याने आयुष्यभर शिकतच राहिले पाहिजे.चुकतो तो मानव व चुकत नाही तो महामानव असतो.असे प्रतिपादन बाळकृष्ण कांबळे यांनी केले. येथील सांस्कृतिक भवन (मिलिंद हौसिंग सोसायटी) येथे कार्तिक पौर्णिमेसह धम्मसेनापती भन्ते सारिपुत्र व सम्राट अशोक स्मृतिदिन तसेच क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती व गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा आसनगावचे भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण कांबळे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर होते.
अनिल वीर म्हणाले,”१८० करोड पेक्षा अधिक लोक जगात बौद्ध विचार मानतात. त्यामध्ये भारतासह नेपाळ,चीन, थायलंड, व्हिएतनाम,कंबोडिया,सिंगापूर,मलेशिया,श्रीलंका,म्यानबार,इंडोनेशिया,पाकिस्तान,जपान आदी देश आहेत.आषाढ पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमेपर्यंत वर्षावास असतो.अश्विनी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कठीण चिवर दान केले जाते. धम्मच आधुनिक व नैतिकदृष्ट्या समाजनिर्मिती करू शकते. राजकारण करण्यासाठी पुढे आलेच पाहिजे.मात्र,मूल्यांची घसरण झाली आहे.नेते निर्णय काय घेतील ? त्याचा कार्यकर्त्यांना थांगपत्ता लागत नाही. सध्याच्या राजकारणात तथ्य नाही.जोपर्यंत सूर्य-चंद्र-तारे आहेत.तोपर्यंत संविधान अबाधित राहणार आहे.तरीही विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता वास्तववाद व विशालदृष्टिकोणतून सतर्क राहणे काळाची गरज आहे.”
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ.गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली.सामुदायिक त्रिशरण-पंचशील गृहण करण्यात आले.भीमगीतांचा विशेष कार्यक्रम शाहिर श्रीरंग रणदिवे आणि सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत चालला होता.खिरदादाने सांगता झाली. सदरच्या कार्यक्रमास रमेश इंजे,पी.डी.साबळे,प्रकाश तासगावकर,प्रसाद गायकवाड, महादेव मोरे,किशोर गायकवाड, श्रावस्ती कांबळे, कोमल कांबळे, उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या. संयोजक शाहिर श्रीरंग रणदिवे यांनी स्वागत केले.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.याकामी, चिन्मयी कन्स्ट्रक्शनचे महावीर किसन गायकवाड यांचे प्रमुख संयोजन होते.