सातारा : असून अडचण नसून खोळंबा…अशी केविलवाणी परिस्थिती येथील शनिवार पेठेतील चिंतामणी हाॅस्पिटल समोरच्या बोळात झाली आहे.
पालिकेने चेंबरचे काम केलेले आहे.मात्र,महिना झाला तरी अद्याप त्यावर काहीही झाकणं बसवलेली नाहीत.त्यामुळे दिवसाचे नागरिकांना जा-ये करताना अडचण होत आहे. रात्रीच्यावेळी काय अवस्था होत असेल.मोठी इजा होण्याची शक्यता आहे.तेव्हा संबंधितांनी वेळीच झाकणं लावण्याचे काम करावे.अशी मागणी नागरिकातर्फे अविनाश मोरे,यशवंत घोरपडे यांनी केली आहे.