सोळशी / प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे
छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजीत गडकिल्ले साफसफाई स्वच्छता मोहीम चंदन वंदन गड कल्याणगड वैराटगड सातारा मोहीम क्रमांक ७० संपन्न झाली. गडावरील बिसलेरी बॉटल कचरा व गडावर वाढलेली काटेरी झाडे तोडण्यात आली. गडावरील दुर्गा माता देवी मंदिर परिसर साफसफाई स्वच्छता करण्यात आले. हनुमान मंदिर परिसर स्वच्छता करण्यात आले. महादेव मंदिर परिसर साफसफाई स्वच्छता करण्यात आले. यावेळी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी, महाराष्ट्र राज्य सहसंपर्कप्रमुख सचिन पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे, मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र वीर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश ढेरे, परंडा तालुका उपाध्यक्ष महेश जगताप , सातारा जिल्हा अध्यक्ष अभिजित लेंभे, वैभव निकम, शिवभक्त उपस्थीत होते.