अनिल वीर सातारा : महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्यावतीने भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सन्मानपत्र ट्रॉफी व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.तेव्हा छ. शिवरायांची प्रतिमा भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदरच्या पुरस्कार सोहळा सातारा (राजवाडा) येथील पाठक हॉल येथे संस्थापिका – अध्यक्षा सौ.प्रतिभा शेलार यांनी सुरेख असे आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये निवडक उत्कृष्ट पत्रकार,वकील,सामाजिक कार्यकर्ते,समाजसेविका,वैद्यकीय अधिकारी,पोलीस,गायन,व्याख्यान व शिवगर्जना – शिवरायांची शौर्यगाथा तसेच संविधानिक कार्य करणारी व्यक्तिमत्व अशा सर्व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, प्रतिभा शेलार व महेंद्र आबा जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचा संस्थापिका प्रतिभा शेलार यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.त्यानंतर कु.आलिया बागवान हिने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना व शौर्यगाथा सादर केली.अबूबकर बागवान यांनी भारतीय संविधानाचे मूलभूत हक्क व कर्तव्य याचे सादरीकरण केले. त्कु. ईश्वरी भोकरे हिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर केला.ऍड. शिवाजी यशवंतराव देसाई यांचे भारतीय संविधानावर व्याख्यान सादर करण्यात आले.स्त्री सशक्तिकरण या विषयांवर विजया साखरे यांचे मार्गदर्शन झाले.पंडित अभिजीत कुलकर्णी यांच्यासह पुरस्कार विजेत्यांसह नगर वाचनालयलयाच्या ग्रंथपाल रूपाली मुळे यांचेही मनोगत व्यक्त झाले.अभिनेत्री गायिका धनश्री बागडे यांनी सुंदर गाणं गाऊन प्रेक्षकांना मनमोहून टाकले.
रेस्क्यू टीम सेवा करणारे दीपक जाधव यांनीही भाष्य केले. आपले मनोगत व्यक्त केले. महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांच्या कार्याचे कौतुक आणि प्रशंसा सर्वच वक्त्यांनी केली. धाडसी आणि संविधानिक कार्य करणाऱ्या प्रतिभा शेलार यांनी असेच कार्य करत रहावे.त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहू. असेही आश्वासन हे दिले.पर्यटन विकास सामाजिक कार्य करणाऱ्या सौ. लिलाबाई गणपत जाधव आणि त्यांच्या कुटुंबातील संपूर्ण परिवाराने प्रतिभा शेलार यांना छ. शिवाजी महाराज यांची फ्रेम भेट देऊन त्यांचा सन्मान व सत्कार केला.तसेच उपस्थीत महिला व मैत्रिणी यांनी प्रतिभा शेलार यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. सुरेश दयाळ यांनी उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सामाजिक कार्यकर्त्या सौ.शितल मिसाळ यांनी प्रवेशद्वारावर उत्कृष्ट अशी रांगोळी काढून सर्व कार्यक्रमात आलेले पाहुणे पुरस्कार मानकरी व प्रेक्षकांचे बहारदार असे स्वागत केले. अशा विविधतेने नटलेल्या कार्यक्रमांची रंगत शेवटपर्यंत होती.
यावेळी अमर जाधव, सुवर्णा कचरे,नासिर बागवान, शंकर माने,समीर निकम,शोभा भोसले,पांडुरंग माने,संभाजी मदने,जगन्नाथ लोहार,राहुल चव्हाण,शशिकला घाडगे,किरण खरात,शितल मिसाळ,सुरेश दयाळ,अक्षय चव्हाण,सुधीर माने,पंडित अभिजित कुलकर्णी, दिपक जाधव,महेंद्र आबा जाधव, लिलाबाई जाधव,मोहन जगताप,सुशील गायकवाड,पद्मा गिऱ्हे,अर्चना सावंत,ईश्वरी भोकरे,आलिया बागवान,शर्मिला बाबर, डॉ. सुप्रिया नाईक, सरोजनी शिंदे, विकास तोडकर, किशोर आढाव, प्रशांत पोतदार, ॲड. अशोक रामटेके, रवींद्र चांदणे,प्रकाश काशीळकर, डॉ.सचिन सादरे, ऍड.शिवाजी देसाई,मेहरुनिया मुलांनी, सिस्टर ब्लेसी,ऍड. आलिम पटेल,वंदना शिंदे, कुमुदिनी अदाटे, मंगल भिंगारे, भागोजी शिखरे,नूरजहा खाटीक, ऍड.जहुर इनामदार, अनिल वीर,ऋषिकेश गायकवाड, सौ.धनश्री बागडे,सौ. सुवर्णा पाटील, रूपाली मुळे,अब्बूबकर बागवान, सौ.विजया साखरे आदी पुरस्कार विजेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,युवक व युवती मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.