सातारा : छ. शिवरायांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास पाहिला तर प्रत्येक कृतीत अभ्यासपूर्ण असे चातुर्य आढळून येत आहे.असे गौरवोद्गार प्राचार्य विजय नलावडे यांनी काढले.
नागेवाडी-कुशी,ता.सातारा येथील लोकमंगल हायस्कुलमध्ये हस्तलिखित अंकाचे भव्य प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. तेव्हा फित कापून औपचारिक उदघाटन प्राचार्य विजय नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी दीपक खांडके व बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर याची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष शिरीष चिटणीस होते. यावेळी शाळेंनी अनेक वर्षांपासून केलेल्या हस्तलिखितांचा संग्रह प्रदर्शनात ठेवला होता.यावेळी मराठी विषयाचे शिक्षक भगवान जाधव यांनी अध्ययनार्थींच्या सहाय्याने “शब्दफुले” या हस्तलिखितांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आला. प्राचार्य नलावडे म्हणाले, “राजमाता जिजाऊ यांनी छ. शिवरायांना घडविले.तेव्हा आई याच प्रत्येकाच्या गुरू असतात./हस्ताक्षर हा खरा दागिना आहे. विद्यार्थीदशेतच संस्कार होत असतात.तेव्हा चांगले-वाईट समजले की जीवन जगण्याची दिशा समजते.” दीपक खांडके म्हणाले, “शिक्षण हे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून असले पाहिजे. शिक्षण खरोखर उत्तम अशी गुंतवणूक आहे.तेव्हा पहिल्यांदा शिक्षणास प्राधान्य दिले पाहिजे.”
अनिल वीर म्हणाले,”शब्दफुले हा हस्तलिखित या वर्षातील सर्वोत्तम आहे.कारण,मी सर्व हस्तलिखित प्रकाशन सोहळ्याचा साक्षीदार आहे.शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी एकापेक्षा एक हस्तलिखित निर्माण केली आहेत. “शब्द नि:शब्द” ही कविता कॉलेजला असतानाच मी लिहिली होती.तेव्हापासूनच शब्दांवर प्रेम करीत आलो आहे.त्यामुळे चुकीच्या शब्दांना आपण थारा देत नाही.सर्वच उपक्रम संस्थेच्या माध्यमातून चिटणीससाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाखात नाविन्यपूर्ण राबविले जातात.” शिरीष चिटणीस म्हणाले, “मानवाने स्पर्धा ही स्वत:शीच करावी.म्हणजे यश संपादन करण्यासाठी मदत होते. कलागुणांना वाव मिळावा म्हणून बालकुमार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.जिद्द व चिकाटीने अध्ययनार्थीने भरभरून यश मिळवण्यासाठी सातत्याने सुसंस्कारित असे अध्ययन केले पाहिजे.” यावेळी सोहम सावंत,सानिका साळुंखे, रोहिणी सावंत व रोहन सावंत यांनीही मनोगत व्यक्त केली. भगवान जाधव यांनी प्रास्ताविक केले.मुख्याध्यापिका विद्या बाबर यांनी आभारप्रदर्शन केले.प्रारंभी मुलींनी स्वागतगीत व इशस्तवन सादर केले. सदरच्या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व अध्ययनार्थी उपस्थित होते.