सातारा : छ. शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करून सर्वधर्मसमभावाचे विचार दिले.असे प्रतिपादन मसाप पुणे प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये इतिहास संशोधक प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे यांचे ‘ प्रतापगडावरील ऐतिहासिक लढाई ‘ या विषयावर सविस्तर असे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.तेव्हा चिटणीस बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी होते.
शिरीष चिटणीस म्हणाले, “भारतात विचार आणि आचार एकमेकांशी निगडित आहेत. शिवाजी महाराजांचं त्याकाळी जे काही शौर्य सर्वत्र पसंरल होतं ते ऐकून अफजल खान थोडा मानसिक तणावात होता.”
शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाचे विचार त्याकाळी संपूर्ण मराठी साम्राज्याचा दिले. त्यांच्या सैन्य दलात सर्व धर्माचे लोक होते.”
प्राचार्य डॉ. विजयराव नलावडे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा आपल्या मधीलच काही लोकांनी त्यांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी विरोध केला होता. शिवाजी महाराजांच्या बाबतीत ज्या काही घटना घडलेल्या आहेत. ते ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. जगाच्या इतिहासामध्ये मिठाई वाटून पसार होणारे शिवाजी महाराजांचे आग्र्याहून झालेली सुटका ऐकली की मन कसे प्रफुल्लित होते. दक्षिणेमध्ये आदिलशाहीचे प्रस्थ निर्माण करण्यामध्ये अफजलखानाचा खूप मोठा वाटा होता. मी माझ्या भूभागावर स्वतंत्र आहे ही कल्पना म्हणजे स्वराज्य होय. छ.शिवाजी महाराजांनीच आपणाला ती शिकवण शिकवली. पराक्रमी माणसाच्या इतिहासात नेहमीच द्वंद्व असते. असे निर्माण करण्यामागे प्रसिद्धीचा हव्यास असतो. शिवाजी महाराज ही आपली प्रेरणा आहे. या प्रेरणेला गालबोट लावू नका. शिवाजी महाराजांना मदत करणारे कान्होजी जेधे हे देखील होते. अतिआत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स पैशाचा व ताकदीचा नसावा. हे आपण शिवाजी महाराजांच्या विचारातून शिकले पाहिजे. स्वराज्यावर आलेले अफजलखानाचे संकट हा इतिहासामधील टर्निंग पॉईंट होता. शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळी मरणाचे व संकटाचे प्रसंग आले होते. त्यावेळी ते स्वतः त्याला सामोरे गेले होते. एकमेव कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे होता. प्रतापगडचा वेढा म्हणजे जगाच्या इतिहासात अमर झाला. अफजलखानाचा वध झाला. त्यावेळी झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांचे १७३४ सैनिक तर अफजलखानाचे ५००० सैनिक मृत्युमुखी पडले. मराठ्यांच्या इतिहासातला हा वैभव दिन झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असेच वाढत गेलेले पहावयास मिळते. आयुष्यात विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज कळले तर त्यांना पुढे काही शिकवावे लागत नाही. शिवाजी महाराज अफजल खान दोघेही आपापल्या परीने मोठे होते. अफजल खान शेर असला तरी शिवाजी महाराज सव्वाशेर होते हे निश्चित. अफजलखानाच्या वधानंतर प्रतापगड या किल्ल्याच्या पायथ्याशी बांधलेल्या कबरीला दिवाबत्ती करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कायमस्वरूपी दोन गावांचा महसूल त्या ठिकाणी देऊ केला होता. यावरून शिवाजी महाराज शत्रूलाही कशाप्रकारे वागणूक देत होते ? हे सिद्ध होते.” प्रकाश गवळी,कल्पना टिपणीस आदींनीही मनोगत व्यक्त केली.
सदरच्या कार्यक्रमास सुरेश शिकारखाने, सुचिता शृंगारपुरे, कल्पना टिपणीस, वि. ना. लांडगे, डॉ. राजेंद्र माने, अनिल वीर, दीपक खांडके, राजेश जोशी, साहेबराव होळ, गुलाब शेख, प्रशांत आहेरराव, आदित्य आहेरराव, मोहन कारखानीस, सुनिता कदम, गौतम भोसले, आनंद ननावरे, राजेश चिटणीस, संजय आचार्य, सौ.शिल्पा चिटणीस, संचालक अनिल चिटणीस, प्रदीप लोहार, जगदीश खंडागळे, हणमंत खुडे, कल्याण भोसले, बाळासो इंगळे, अनिल सुर्वे, शेग्या गावीत, आग्नेश शिंदे, दत्तात्रय शिर्के, जनार्दन निपाणे, विनोद कामतेकर, अनिल मसुरकर, रविराज जाधव, सचिन शिंदे, शुभम बल्लाळ आदी उपस्थित होते. गुलाब पठाण यांनी सूत्रसंचालन केले. विनायक भोसले यांनी आभार मानले.