जगणं नव्याने जगताना कॅन्सर योद्यांचा प्रेरणादायी प्रवास !

0

अनिल वीर सातारा : “जगणं नव्याने जगताना कॅन्सर योद्यांचा प्रेरणादायी प्रवास” हे पुस्तक ऐश्वर्या तानाजीराव भोसले यांनी  लिहिलेलं आहे. सदरच्या पुस्तक नियमित होणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. स्वतः कॅन्सरने तिसऱ्या स्टेजवर असतानाही त्यांनी पूर्णपणे संयमाने आणि विवेकाने फक्त वैज्ञानिक उपचार घेऊन यावर मात केली. याचे अनुभव कथन त्यांनी केले.

लेखकांनी स्वतः अनुभव ऐकताना खरोखरच सर्वच कार्यकर्ते काही काळ स्तब्ध झाले होते. या पुस्तकामध्ये अशाच कॅन्सर योद्धांचे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी अनुभव लिहिले आहेत. याही पुढे हे पुस्तक कॅन्सर ग्रस्तांना मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल. यात शंका नाही.  सातारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या  मध्यवर्ती टीमला त्यांनी एक पुस्तक भेट दिले.पुस्तक कोणाला हवे असल्यास रु.500/; चे पुस्तक 50 टक्के सवलतीच्या दरात रु.250/- रुपयात सातारा येथे उपलब्ध होईल.याची नोंद घ्यावी. ज्यांना हवे असेल त्यांनी आपले नाव व नंबर कळवावा.असेही संयोजकांनी सांगितले. शशिकांत सुतार यांनी चळवळीचे सामूहिक गीत घेतले.

डॉ.दीपक माने यांनी लिहिलेल्या भविष्यावर बोलू काही या लेखाचे वाचन केले.यावेळी सातारा शहर व एमआयडीसी येथील देणगी व जाहिराती संकलन यांचा आढावा घेण्यात आला.मानस मित्र विभाग आयोजित पुणे येथे झालेल्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे रिपोर्टिंग प्रशांत पोतदार यांनी केले. सदर शिबिरात सातारा,रहिमतपूर व कराड शाखेतील कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यातून अनिस शाखा स्थापन करण्याबाबत आलेल्या पत्राचे वाचन भगवान रणदिवे यांनी केले.यावेळी ऐश्वर्या भोसले,उदय चव्हाण,प्रकाश खटावकर,दशरथ रणदिवे,राजेश पुराणिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here