सातारा : प्रतिनिधी : आज धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे पाहायला अजिबात वेळ नाही, आज जिमचा व्यायाम ही काळाची गरज बनली आहे, शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम” असे आपली वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात कारण व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते आणि मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळेतील पुस्तकात वाचले असेल आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असते परंतु एवढे वाचून किंवा ऐकूनसुद्धा नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांची संख्या समाजात कमीच आहे. पहाटे किंवा सकाळी लवकर उठून जिमला जाणाऱ्या लोकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे असे दिसते असे मत अतुल राऊत, बॉडीबिल्डर अँड फिटनेस असोसिएशन जज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मन आणि मेंदू ला आपण काबू करू शकत नसल्यामुळे आजची युवा पिढी गुलाम होताना दिसत आहे, अशीच वाटचाल चालू राहिल्यास इतर देशांच्या तुलनेत आपण पाठीमागे राहूच परंतु अनेक प्रकारच्या व्याधी ने आपण त्रस्त झाल्याशिवाय राहणार नाही मोबाईल असो किंवा इंटरनेट असो योग्य कामासाठीच उपयोग करणे आवश्यक आहे, त्याच्या आहारी गेल्यास विनाश निश्चित आहे
गेले १७ वर्ष मी या फिटनेस क्षेत्राशी निगडित असून कित्येक जणांना सुदृढ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी तयार केले आहे. आज पुण्यासारख्या प्रगतशील व फिटनेस क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणाऱ्या मान्यवरांना माझ्याकडून मार्गदर्शन करण्याचा योग आला तेच मी माझे परम भाग्य समजतो. काही वर्षांपूर्वी देशावर आलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीमध्ये या फिटनेस क्षेत्रानेच लोकांना आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले व कित्येकांचे प्राण देखील वाचवले.
आज प्रसारमाध्यमांशी अतुल राऊत, बॉडीबिल्डर अँड फिटनेस असोसिएशन जज हे बोलत होते यावेळी या क्षेत्रातील अभ्यासक अक्षय लोखंडे, फिटनेस कौन्सिलर तसेच या क्षेत्राशी निगडित असणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.