सातारा/अनिल वीर : कोरेगाव तालुक्यातील भीमनगर आणि दरे येथे एसटी बस नसल्यामुळे प्रामुख्याने अध्ययनार्थींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली ३ दिवस झाले आंदोलन सुरू झाल्याने अर्थात आंदोलनाची हॅटट्रिक झाली आहे.
गावात एसटी सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. तिसऱ्या दिवशी शाळा-कॉलेजचे अध्ययनार्थी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवुन आक्रोश व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीमनगर आणि दरे ही गावे कोयना धरण पुनर्वसित आहेत. गावातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि शाळेत जाण्यासाठी एसटीची सुविधा नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर चालत जावे लागत आहे.एसटी आगारापर्यंत कैफियत पोहचलेल्या आहेत.मात्र,त्यांनी अद्याप ठोस अशी भूमिका घेतलेली नाही.तेव्हा लवकरात लवकर एसटी सुरू करावी.अशी आर्त भावना सर्व अध्ययनार्थी यांच्यावतीने आयटीआयची विद्यार्थिनी कु.श्रावणी कांबळे यांनी व्यक्त केली.