सातारा/अनिल वीर : समस्त शाहूनगर व विलासपूरवासीय यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी एकदिवसीय आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न झाले. यावेळी विक्रांत पवार,विजय निकम,अस्लम तडसरकर, एस.लावंडं आदींनी मार्गदर्शन केले.वेगवेगळ्या मुद्दावर चर्चा व विचार विनिमय झाला.
येथील शाहूनगर परिवर्तन समिती ग्रुप व सातारा शहर सुधार समिती यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने कोणत्याही सोयी सुविधा सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून पुरवलेल्या नसतांनाही अवास्तव लादलेली घरपट्टी संदर्भात तसेच कॄष्णा नदीचे दूषित पाणी ऐवजी कास तलाव/कन्हेर जलाशयातून पिण्याचे पाणी मिळावे.इतरही काही अडीअडचणी यासाठी लढा चालू केला आहे.गेल्या दोन महिन्यापुर्वी जिल्हाधिकारी यांना मुख्याधिकारी यांच्या समवेत सदर प्रश्नाबाबत मिटींग लावावी. यासाठी पाठपुरावा करीत आहोत. सध्या चालू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये आपला प्रश्न मांडण्यात येणार आहेच.त्याचबरोबर शाहूनगरवासीय वकील बांधवांमार्फत कायदेशीर बाबी संभाळून पाठपुरावा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या भावना, अडीअडचणी शासना पर्यंत पोहचवण्यासाठी एक दिवसीय धरणा आंदोलन शांततेच्या मार्गाने संपन्न झाले. सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन शिष्टमंडळाने सादर केले. यावेळी शाहूनगरवासीय, विलासपूर, रामराव पवार नगर, गोळीबार मैदान,मंगळाई कॅालनी, एस.टी. कॅालनी, एल.आय सी. कॅालनी, युनायटेड बॅंक कॅालनी, शिवनेरी कॅालनी, जगतापवाडी, घुले कॅालनी, गुरूकॄपा सोसायटी, मंगळाई व चार भिंती पायथा परिसर,गुरूकुल परिसर, शिंदेकाॅलनी, विद्या नगर व इतर सर्व परिसरातील थोडक्यात, त्रिशंकू भागामधील नागरिक लढा देण्यासाठी धरणे आंदोलनात शेकडो नागरिक-कार्यकर्ते उपस्थित होते.