चुकीची शस्त्रक्रियेमुळे डॉ.ननावरे व डॉ.डुबल यांना निलंबित करावे : आदित्य गायकवाड
सातारा/अनिल वीर : चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे डॉ. नागेश ननावरे व डॉ. अभिषेक हुबल यांची चौकशी करुन तात्काळ निलंबीत करावे.अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी केली आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उन्ह-वाऱ्यासह चक्क पावसातही धरणे आंदोलन सुरू झाले आहे.
सौ.गौतमी शशिकांत पाटील यांनी सोमवार दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजता कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी सोनवडे, ता.पाटण येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आली. तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची प्राथमिक चाचणी न करता त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष शस्त्रक्रिये दरम्यान त्यांना सर्व जाणीव होत असल्यामुळे खुप त्रास होत होता. त्यामुळे ते डॉक्टरांना वारंवार शस्त्रक्रीया थांबवण्यास विनंती करीत होत्या. त्यांना खुप त्रास होत होता. परंतु, डॉ. नागेश ननावरे व डॉ. अभिषेक डुबल यांनी त्यांचे कोणतेही म्हणणे न ऐकुन घेता त्यांचे हात-पाय बांधून तोंडाला पटटी लावून जबरदस्तीने शस्त्रक्रिया चालू ठेवली होती. ऑपरेशन झालेनंतर त्यांचेकडून त्यांना बाहेर वॉर्डमध्ये 12 वाजता टाकण्यात आले. त्यांनतर 1 ते 2 तासानंतर त्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांना खुप त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांना सलाईनमधून पेनकिलर औषध सोडून इंजेक्शन दिले. त्यानंतर दि. 22 मे 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता डिस्टार्ज देण्यात आला होता. त्यांना घरी नेण्यात आले. नंतर 1 ते 2 तासांनी त्यांचे परत पोट फुगले व पोटात दुखू लागले म्हणून त्यांना त्यांचे नातेवाईकांनी त्याच हॉस्पीटलमध्ये दि. 22 मे 2024 रोजी घेवून गेले. त्यानंतर त्यांनी सलाईनमधून परत पेन कीलर सोडले व इंजेक्श्न देण्यात आले. पंरतु त्यांना काहीही फरक पडला नाही. उलट जास्त पोट दुखु लागले व पोट फुगले म्हणून सोनवडे रुग्णालयातील सरकारी गांडीतून त्यांनीच सोनोग्राफीसाठी पाटणला नेले. परंतू, त्याठिकाणी सोनोग्राफी न करता तेथील डॉकटरांनी त्यांना कराड रुग्णालयातील हॉस्पिटलला जाण्यासाठी सल्ला दिला. त्याच गाडीतून नर्स व पेशंट कराड याठिकाणी कॉटेज कुठीर हॉस्पिटलला घेवून दि. 23 मे 2024 सकाळी 11.30 वाजता घेवून गेले. परंतू, त्यांना पेनकिलर देण्यात आले. पण त्याचा काहीच फरक पडला नाही. उलट जास्त त्रास होत गेला व ऑक्सिजन लेवल कमी झालेमुळे व्हेंटिलेटरची गरज भासल्यामुळे दि.24 मे 2024 सकाळी 8 वा. सातारा सिव्हिल रुग्णालय येथे पेशंटला नेण्यास सांगितले. परंतू, पेशंटची अवस्था जास्त खराब झालेमुळे त्यांच्या कुटुंबाने सहयाद्री हॉस्पिटल, कराड येथे घेवून गेले. परंतु, कराड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पेशंटची अवस्था बघून पेशंटच्या नातेवाईकांना कृष्णा हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला. परंतु, तेथे कराड हॉस्पिटल मध्येही पेशंटची अवस्था बघून त्यांच्या कुटुंबाने पेशंटला सांगलीला भारतीय हॉस्पीटलला दु. 1.30 वाजता घेवून गेले. त्यावेळी भारतीय हॉस्पिटलमध्ये पेशंटला अॅडमीट करुन उपचार घेण्यास सुरुवात केले. यात 2 दिवसाचा कालावधी दिला. सदर हॉस्पिटलमध्ये पेशंटचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये असे दिसून आले की, पेशंटच्या मोठ्या आतड्याला भोक पडून सर्व घाण पोटात पसरुन इंनफेक्शन झालेले दिसून आले. त्यामुळे किडनीला व लिव्हरला मोठ्या प्रमाणात इंनफेक्शन झाले. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी ऑपरेशन घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सांगितले कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया चुकीची झालेमुळे त्यांची डाव्या बाजूची ट्यूब काढून टाकली व त्या पेशंटला 5 ते 6 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज पडली. मोठ्या आतड्याला होल पडल्यामुळे ते बाहेर ठेवन्यात आले व दोन्ही बाजूला होल पाडण्यात आले आहे. परंतु, पेशंटची परिस्थिती अजूनही नाजूक झाली. यातून सर्व सावरल्यानंतर पेशंटला डॉक्टरांनी सांगितले आहे की, पुन्हा 3 महिन्यांनी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.तेव्हा या सर्व त्रासाला डॉ. नागेश ननावरे व डॉ. अभिषेक डुबल हेच सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.त्यांची चौकशी करुन या दोघांना निलंबीत करण्यात यावे.
सातारा सिव्हील सर्जन युवराज कर्पे तसेच जिल्हापरिषद आरोग्य अधिकारी खलिपे यांनीही लक्ष्य दिले नसल्याने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिले असून निवेदनाच्या प्रति जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिव्हील हॉस्पिटल, जिल्हा पोलीस निरीक्षक व शहर पोलिस स्टेशन सातारा यांनाही दिल्या आहेत.