जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा भारतीय बौद्ध महासभा, वंचित व समविचारी संघटनांचे आंदोलन संपन्न 

0

अनिल वीर सातारा : बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता  पूर्व विभाग जिल्हा भारतीय बौद्ध महासभा,वंचित बहुजन आघाडी आदी समविचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.

               भारत देशातील बिहार राज्यातील बुद्धगया या ठिकाणी महाबोधी महाबुद्धविहार हे बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात नसून ते तेथील हिंदूंच्या ताब्यात असल्याने ते महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे. याकरीता अनेक दशके प्रयत्न चालू आहेत.

आता सदर आंदोलनास देशव्यापी स्वरूप निर्माण झाल्याने तो लढा हा तमाम बौद्धांच्या अस्मित्तेचा लढा निर्माण झाल्याने पूर्व भागातील फलटण,कोरेगाव,माण,दहिवडी आदी ठिकाणी आंदोलनं करून पोलीस ठाणे, तहसीलदार,प्रांत आदी ठिकाणी निवेदनही सादर केली.आपल्या अस्मित्तेसाठी व अस्तित्वासाठी सातारा येथे प्रचंड संख्येने कार्यकर्ते आले होते. त्यांनी प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.समता सैनिक दलातर्फे सलामी देण्यात आली. वंदना सामुदायिक घेण्यात आली.तेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झालेत.

दरम्यान,पूर्व विभागीय मान्यवर, पदाधिकारी,उपासक व उपासिका यांचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सम्पर्कप्रमुख चंद्रकांत खंडाईत,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक इंजि. रमेश इंजे, कार्याध्यक्ष अनिल वीर,उपाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ व ऍड.विलास वहागावकर आदींनी स्वागत केले. प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास रिपब्लिकन सेनेचे नेते दादासाहेब केंगार, सुनील निकाळजे,अंकित वाघमारे व गौरव भंडारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तद्नंतरपूर्व भागातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते,उपासक व उपासिका यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.अरुण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.संपूर्ण विधी भन्ते धम्मानंद यांच्या अधिपत्याखाली संपन्न पार पडला.घोषणांनी पुतळा परिसर दणाणून गेल्यानंतर सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सक्रिय झाले.

   सदरच्या आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष वाघमारे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोहितें,श्रीमंत घोरपडे आदी आजी-माजी पदाधिकारी,तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते, समता सैनिक दल व तत्सम विविध संघटनांचे प्रतिनिधी,चंद्रकांत खंडाईत, श्रीमंत घोरपडे, नानासाहेब भोसले,दादासाहेब कांबळे, सुजाता गायकवाड, किशोर गायकवाड,अशोक भोसले, अर्चना चव्हाण, गायकवाड मॅडम,स्वाती खरात,प्रीती खरात,गंगा सोनवणे,सचिन चव्हाण,किशोरी काकडे,मंदा नाईक,गणेश भालेराव,उमेश खरात,अशोक माळी,निखिल खरात,प्रकाश डोईफोडे,अविनाश जगताप, दादासाहेब भोसले,दत्ता खरात,रमेश इंजे,ऍड. विलास वहागावकर,अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.सरतेशेवटी पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here