जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ दिवस सुरू असलेल्या आंदोलनास प्रशासनाची पाठ !

0

अनिल वीरसातारा : जिल्हा हा पेन्शनरचा म्हणून पूर्वी ओळखला जात होता. आता दारू,जुगार,क्लब, मटक्याचं चक्री नावाच्या जुगाराने तर संपूर्ण जिल्ह्याला विळखा घातलेला आहे. या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे आंदोलन सुरू आहे.३ दिवस झाले तरी प्रशासनाने दखल घेतली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असून तिसऱ्या दिवशी दिवसाखेर कोण्हीच दखल घेतली नसल्याने संतापाची लाट पसरली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दि. ७ मार्च २०२५ रोजी चक्री जुगार मटक्याबाबत लेखी निवेदन दिले होते. कारवाईची अपेक्षा ठेवली होती. परंतु,साधी एकही कारवाई करण्याचे धारिष्ट पोलीस दलाकडे राहिलेले नाही. शिरवळ, खंडाळा व वाई येथील २ व्यक्ती जिल्ह्यामध्ये आय.डी. वाटप करून चक्री जुगार जोमाने चालवत आहेत. हवालाकांड सारखं चक्रीकांड जिल्ह्यात सुरू आहे. पोलीस अधीक्षक पासून ते साध्या भेट अंमलदारांपर्यंत याची कल्पना आहे. असे गृहीत धरून निवेदन दिले होते.

               

जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा व वाई येथील दोन व्यक्ती आयडी वाटप करून चक्री जुगार संपूर्ण जिल्ह्यात खुलेआम चालवत आहेत.या चक्रीकांडमध्ये पोलीस दलातील प्रत्येक घटकाला याची कल्पना असून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जुगार मटका बुकिंग यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी सक्षम पोलीस अधीक्षकाची गरज असल्याचे बोलले जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही मागनि आंदोलनाची वेळ आणणाऱ्या जिल्ह्यातील महसूल व पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांबाबत आता सहानभूती राहिलेली नाही. असे स्पष्ट करून संजय गाडे यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यात आठ आमदार व दोन खासदार असूनही चार मंत्रिपद दिलेले आहेत. चक्रीकांडबाबत कुठे आहे कायदा ? कुठे आहे पोलीस अधीक्षक ? कुठे आहे जिल्हाधिकारी ? सर्वत्र आहे नुसतेच हप्ते. अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.

              यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय गाडे, मोरे,तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड,जिल्हाध्यक्षा सुनिताताई येवले,विशाल कांबळे व महेश शिवदास यांच्यासह कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलन स्थळी भेटी देऊन जाहीर पाठिंबा  व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here