सातारा /अनिल वीर : घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडर दरवाढीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून भाकरी-ठेचा करण्यात आला.शिवाय,दुसऱ्या चुलीवर चक्क रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी चक्क वडे तळुन खऱ्या अर्थाने शासनाचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
नुकताच शासनाने गॅस दरवाढ केलेली आहे. ती सतत वर्षभरात तीन ते चार वेळा दरवाढ केलेली आहे. हे गॅस दरवाढ सर्वसामान्य जनतेला न परवडणारे असून याकडे आपण लक्ष घालावे. गेल्या महिन्यात घरगुती गॅस दर रु.१,०५७.५०/- इतका होता तर आज घरगुती गॅस सिलेंडर रु.१,१०७.५०/- इतका आहे. घरगुती गॅस सिलेंडर रु.५०/- ने केला असून कमर्शियल गॅस रु.३५० ने केला आहे. या गॅस दर वाढीच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्यावतीने जिल्ह्यात अनोखे आंदोलन करण्यात आले. दरवाढही शासकीय असताना जिल्हामध्ये असणारे सर्व गॅस एजन्सीवाले शासकीय रुपये न घेता २५ ते ३० रुपये जादा आकारून म्हणजेच रु.१,१३०/- ते १,१३५/- प्रति एक सिलेंडर घेतात. शासनाची दर वाढ पन्नास रुपये व एजन्सी वाल्यांची रु.३०/- अशी आहे. हे सर्व सामान्य जनतेला न परवडणारे आहे. तरी हा निर्णय शासनाचा पूर्णपणे चुकीचा आहे. सबसिडीच्या नावाखाली शासनाने गॅस दरवाढ केली होती. तीही सबसिडी सरकारने तीन-चार वर्ष बंद केलेली आहे. तीन महिन्याला गॅस दरवाढ करत आहेत.तरुणांना व्यवसाय करा म्हणून सांगणाऱ्या व्यावसायिक गॅसचेच दरवाढ केल्यामुळेच जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन छेडून आंदोलन छेडण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे व महिला पदाधिकारी – कार्यकर्त्या,मदन खंकाळ, सोमनाथ धोत्रे, संजय देवताळकर,महादेव होवाळ,रुपेश कांबळे,सिद्धार्थ माने,नामदेव माळी,खामकर,सागर फाळके आदी जिल्हा,तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.