सातारा /अनिल वीर : राहुडे,ता. पाटण येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षपदी राहुल रोकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.शाळेतील निवडीच्या प्रक्रिया पूर्ण झाली. मुख्याध्यापक,शिक्षक व पालक उपस्थित होते.इतर निवडी पुढीलप्रमाणे आहेत.
उपाध्यक्ष विजय चव्हाण यांच्यासह नियमाप्रमाणे सर्व निवडी जाहीर करण्यात आल्या.प्रामुख्याने,जगदीश चव्हाण,वैशाली चव्हाण,रेश्मा चव्हाण,सुनीता लोखंडे,पूनम पवार,ज्योत्स्ना चव्हाण,अश्विनी पवार,ममता लोखंडे,मीना चव्हाण,गायत्री चव्हाण,सोहम लोखंडे आदींचा समावेश आहे.याबद्धल विविध क्षेत्रातील मान्यवर व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले आहे.