सातारा/अनिल वीर : महाविहार येथे नुकत्याच झालेल्या सहविचार सभेत जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या पूर्व व पश्चिम विभागीय निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.के.भंडारे, राष्ट्रीय सचिव एस.एस.वानखेडे, राज्याध्यक्ष भिकाजी कांबळे आदी मान्यवरांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा शाखेच्या पूर्व आणि पश्चिम विभागाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सातारा पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीमंत घोरपडे,जिल्हा सरचिटणीसपदी अविनाश बारसिंग, कोषाध्यक्षपदी नंदकुमार शिंदे यांची तर पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी सुदाम ढापरे,सरचिटणीसपदी उदय भंडारे, कोषाध्यक्षपदी विद्याधर गायकवाड यांच्यासह इतर विभागाच्या पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.एस.के.भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या गेलेल्या निवडीचे सूत्रसंचालन राज्याध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी केले. एस.एस.वानखेडे यांनी आभारप्रदर्शन केले.या निवडीबद्धल आजी माजी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.