सतत/अनिल वीर : जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कार्यकारिणीची महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन रविवार दि.१४ रोजी दुपारी १२ वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हावशी,ता.पाटण येथे आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेस जिल्हा सरचिटणीस समाजभूषण आप्पासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी पाटण तालुका व शहर कार्यकारिणी यापूर्वी बरखास्त केली असून तिची कार्यकारिणी पुनर्गठीत केली जाणार आहे.तरी पाटण तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते, क्रियाशील सभासद तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.