सातारा/अनिल वीर : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने जिल्हयातील माध्यमिक विद्यालयातील हिंदी शिक्षकांच्या एम.आर.शिंदे स्मृती Storytelling and Essay Competition कथाकथन व निबंध लेखन या जिल्हा स्तरावरील स्पर्धा शनिवार दि.२१ रोजी येथील राष्ट्रभाषाभवनमध्ये सकाळी ११ ते ४ या वेळेत होणार आहेत.अशी माहिती अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी यांनी सांगितले.
कथाकथन स्पर्धेमध्ये जिल्हयातील २७ तर निबंधलेखन स्पर्धेमध्ये ३७ हिंदी शिक्षकांनी आतापर्यंत आपला सहभाग दर्शविला आहे. शिक्षकांच्या या स्पर्धेबरोबरच इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांची थेट जिल्हा स्तरावरील निबंधलेखन स्पर्धा ही याच ठिकाणी होणार आहेत. तसेच मंडळाने तालुका स्तरावर घेतलेल्या सात प्रकारच्या विद्यार्थी स्पर्धेतील सहाशे चौदा विद्यार्थ्यांच्या जिल्हा स्तरावरील ग्रामीण व शहरी विभागातील स्पर्धाही याच दिवशी येथील संभाजीनगरच्या भारत विद्या मंदिर व राष्ट्रभाषाभवनात सकाळी ११ वाजता सुरु होणार आहेत. या स्पर्ध्यांचा उद्घाटन समारंभ प्रा.डॉ.संदेश बिचुकले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.डॉ .गोरख बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तेव्हा जिल्हा स्तरावर होत असलेल्या या वेगवेगळ्या स्पर्धांमधील सहभागी शिक्षक व विद्यार्थी यांनी स्पर्धा ठिकाणी वेळेत उपस्थित रहाण्याचे आवाहन स्पर्धा संयोजक अनंत यादव यांनी केले आहे.