सातारा : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळातर्फे शनिवार दि.२५ रोजी दुपारी १.३० वा.योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीसह ३८ वा.शिक्षक, अध्ययनार्थी व शाळा पुरस्कार समारंभाचे आयोजन अक्षता मंगल कार्यालय,गोडोली (सातारा) येथे करण्यात आले आहेत.अशी माहिती अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी यांनी दिली आहे.
जिल्हा हिंदी अध्यापक मंडळासह एकूण ८ संस्था राष्ट्रभाषाभवमध्ये कार्यरत आहेत.यामध्ये प्रथमपासूनच अनिल वीर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊनही पूर्ण योगदान देऊन कार्यरत आहेत.म्हणुनच त्यांचाही सत्कार करून गौरविण्यात येणार आहे.