जिल्हा हिंदी अध्यापक मंडळातर्फे श्री.व सौ.ननावरे या दाम्पत्यांचा सत्कार 

0

सातारा/अनिल वीर : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळातर्फे श्री.नेताजी ननावरे यांना राष्ट्रभाषा प्रचार-प्रसार पुरस्कार तर सौ.स्मिता नेताजी ननावरे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

     येथील अक्षता सभागृहात श्री.व सौ.दाम्पत्याना अनुक्रमे  माजी शिक्षणाधिकारी दत्तात्रेय तापकीर व माजी बालभारतीच्या विशेषाधिकारी अलका पोतदार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

   नेताजी ननावरे हे हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आहेत.त्यांनी अल्पावधीतच राष्ट्रभाषा प्रचार-प्रसारार्थ भरीव असे कार्य केलेले आहे.

         पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत (इ.५वी) निनाम शाळेतील कु. जागृती जाधव राज्यात अव्वल आली आहे.तिचा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गौरव केला होता.नुकत्याच जाहिर झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक अर्थात इ.५वी शिष्यवृत्ती परीक्षेत कु जागृती प्रमोद जाधव हीने महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावत शाळेच्या शिरपेचात खोचला यशाचा तुरा रोवला असून १०० टक्के यशाची परंपरा कायम राखत एक,दोन नव्हे तर तब्बल सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.त्यामध्ये जागृती प्रमोद जाधवसह हर्षवर्धन प्रशांत महाडीक,अनुष्का संतोष जाधव,अपूर्वा मनोहर जाधव, नमिता श्रीमंत जाधव,देवदत्त साईनाथ कदम व नैतिक केशव नलवडे हेही शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.या सर्व यशस्वी अध्ययनार्थीना  मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ.स्मिता नेताजी ननावरे यांचाही सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here