जिल्हा हिवताप अधिकारी डॉ . कुंभार यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी

0

अनिल वीर सातारा : जिल्हा हिवताप कार्यालय,सातारा या कार्यालयास पूर्ण वेळ अधिकारी द्यावा.शिवाय,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुंभार यांची तात्काळ हकालपट्टी करावी. अशी कास्ट्राईबची मागणी  आहे.

जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असून कार्यालयमध्ये पूर्ण वेळ अधिकारी मिळेना !यापूर्वी, डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी ११ महिने चार्ज घेतला होता.मात्र,या ११ महिन्यांमध्ये अकरा दिवसही ते कार्यालयात उपस्थित नव्हते.याबाबत कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून आरोग्य मंत्री व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिल्यानंतर डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी स्वतःहून जिल्हा हिवताप कार्यालय सातारा येथे काम करणार नाही.असे लेखी पत्र सहसंचालक व उपसंचालक पुणे यांना दिले.त्यानंतर एक ते दीड महिन्याच्या कालावधी नंतर डॉक्टर कुंभार यांची वर्णी लागली. 

सदरची वर्णी लावताना नक्की कोणते मापदंड लावले ?याची शहानिशा होणे गरजेचे आहे . मात्र सदरची वर्णी लावण्यासाठी डॉक्टर कुंभार यांना मोठा घोडेबाजार करावा लागला  आहे.अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे.डॉ . कुभार हे प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिव गड येथे कार्यरत असून  त्यांची प्रायव्हेट ओपीडी काले व  कराड येथे आहे. ते फक्त आठवड्यातून मंगळवार व गुरुवार या दोनच वारी ते  जिल्हा दिवताप  कार्यालय, सातारा येथे येतात.जिल्हा हिवताप कार्यालय सातारा येथे साधारण तीनशे ते साडेतीनशे कर्मचाऱ्यांचे आस्थापना असून बऱ्याच सेवा विषयक अडचणी सध्या कार्यालयात आहेत .या कार्यालयामध्ये लिपिक संवर्गाची पद बरीच रिक्त आहेत.त्यामुळे सदरचा चार्ज हा तांत्रिक कर्मचाऱ्यांना दिलेला आहे . त्यामुळे बऱ्याच प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात . तसेच या कार्यालयात पूर्ण वेळ जिल्हा दिवताप अधिकारी नसल्याने दांडी बहाद्दर कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सध्या चंगळ आहे.तसेच या कर्मचाऱ्यांच्या रजा ही खतावल्या जात नाहीत .

जिल्हा हिवताप कार्यालय सातारा हे कार्यालय आड बाजूला असून तेथे कोणाचेच लक्ष  जात नाही . त्यामुळे त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर कोणाचेच नियंत्रण नाही .म्हणूनच जिल्हा हिवताप अधिकारीपदी स्थानिक सातारा शहरात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचीच वर्णी लावावी. अन्यथा,काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघास तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल. अश्या आशयाचे निवेदन आरोग्य मंत्री (महाराष्ट्र राज्य), आयुक्त आरोग्य सेवा , संचालक उपसंचालक पुणे व सहसंचालक हिवताप पुणे यांना देण्यात आलेले आहे. अशी माहिती कास्ट्राईब  कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी  दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here